Monday, May 6, 2019

जत तालुक्यातील सव्वा दोन लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातल्या  दुष्काळाची तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली असून  उपलब्ध जलस्रोतही आटत चालले आहेत. येथील लोकांना  पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरच्या भरवशावर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये, तर १०७१ वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तापमानातील वाढ अशीच कायम राहिल्यास पाण्याची मागणी अधिक वाढणार आहे.

दरम्यान,जत तालुक्यात सर्वाधिक पाण्याची झळ बसत असून 103 टँकरद्वारा 86 गावांना आणि 650 गावांना पाणी टंचाईचा सर्वात मोठा फटका बसला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. उन्हाळ्याचे चार महिने आव्हानात्मक ठरणार, असेच चित्र त्यावेळी होते. आता मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात वळवाच्या पावसांना सुरुवात होते, तर जूनमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असते. गेल्या तीन वर्षातील पावसाची गती बघितली, तर वळवाचे पाऊस दमदार होत असले तरी संपूर्ण मान्सून अपवाद वगळता कोरडा जात आहे.
जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई अधिक जाणवत आहे. म्हैसाळ योजनेतून काही भागात पाणी पोहोचले असले तरी त्याचा संपूर्ण तालुक्याला फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील ८६ गावे व ६५० वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाच्यावतीने तालुक्यात चारा छावणीही सुरू करण्यात येणार आहेत. अगदी हीच स्थिती आटपाडी तालुक्यात असून, टेंभूचे पाणी शिवारात आले असले तरी, टंचाई कायम आहे.
तालुका।   टॅँकर।   गावे     वाड्या     बाधित लोक संख्या
जत            १०३     ८६      ६५०     २१५१३०
क.महांकाळ १३       १९       ९६      २४२६६
तासगाव       ११       २२       ९२   २६६८४
मिरज।           ५       ८          १६      २०९१४
खानापूर       १४      १२          १       १९६१३
आटपाडी      ३३    २६       २१६     ५०३८१
एकूण            १७९    १७३  १०७१   ३५६९८८

No comments:

Post a Comment