Sunday, May 26, 2019

गर्मीपुढे एसी, कूलर काम करेना

जत,(प्रतिनिधी)-
मागील तीन दिवसापासून तापमान 42 अंशावर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. त्यात एसी व कुलर काम करेना असेच झाले आहेत. शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा 45 डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

गेले चार दिवस शहरात 42 डिग्री तापमानाची नोंद झाली. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कुलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागते. एसीची क्षमताही कमी पडत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमान सामान्यपेक्षा 3 ते 5 डिग्रीने जास्त राहण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट जारी केला जातो. या काळात चार-पाच दिवस समान परिस्थिती कायम राहते. ऑरेंज अलर्टमध्ये पारा सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्री जास्त असतो.
उन्हात जायचे असल्यास पूर्ण अंग झाकल्या जाईल असे सुती कपडे घाला. डोके व चेहऱ्याला सुती कपडा बांधा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, त्यांनी दुपारी 12 ते 4.30 पर्यंत घराबाहेर पडण्यास  डॉक्टरांनीमनाई केली व ताक, लिंबू सरबतसह भरपूर पाणी पिण्यास सांगितले.

No comments:

Post a Comment