Friday, May 17, 2019

माडग्याळ कृषी मंडल कार्यालयाचा भोंगळ कारभार


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील माडग्याळ येथील कृषी कार्यालय हे सतत बंदच असते. मंडलाधिकारी हुवाळे हे फिरकतच नसल्याने इतर कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांचेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे मात्र शेतकर्यांची अडचण होत आहे.

 माडग्याळ येथे ग्राम सचिवालयाशेजारी असलेल्या पोलीस आऊट पोस्टलगत कृषी मंडल अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयात मंडल अधिकारी यांच्यासह सहा जण कामाला आहेत. यात कृषी सहाय्यक व पर्यवेक्षक यांचा समावेश आहे. हे कार्यालय नेहमी बंदच असते. या कार्यालयाचा कारभार गावाच्या बाहेरील एका हॉटेलात बसूनच होत असल्याची चर्चा आहे. मंडलाधिकारी हे बाजाराच्या दिवशी एकदाच येतात. ते कार्यालयात बसतच नाहीत. त्यांचा कारभार हॉटेलात बसूनच कारभार सुरू असतो.
या मंडल अधिकार्याकडून शेतकर्यांना योजनांचा लाभ दिला जात नाही. या कार्यालयाकडून अनेक अनुदाने आले आहेत, मात्र याचा फायदा गरीब शेतकर्यांना दिला जात नाही. पैसे घेऊनच श्रीमंतांनाच अनुदान दिले जाते अशी ओरड शेतकर्यांमधून होत आहे. माडग्याळ मंडळात नालाबांध व बंधार्याची अनेक कामे झाली असून यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा आहे. जिल्हा कृषी अधिकारी यांनी लक्ष घालून माडग्याळ कृषी मंडलाचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment