जत,(प्रतिनिधी)-
गेल्यावर्षी जि.प. अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने शासनाने बदल्या केल्या. यात सुमारे 95 टक्के शिक्षकांच्या बदल्या सोयीस्कर झाल्या. त्यामुळे या बदल्यांना शिक्षकांचा पाठींबा राहिला आहे,मात्र आता याच बदल्याने शिक्षक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक पती-पत्नी पुन्हा विस्थापित होणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्यावर्षी बदल्या झाल्या त्यात पाच टक्के लोकांना त्रास झाला.त्यांच्या गैरसोयी झाल्या. त्यात विविध जिल्ह्यातून अन्यायाची ओरड तर बदल्या चांगल्या पद्धतीने झाल्या असल्याचे समर्थन देखील झाले होते,हजारो शिक्षक शिक्षिकां यांनी अन्याय दूर व्हावा म्हणून शासनाकडे, विभागीय आयुक्त ,जि.प. प्रशासन धाव घेतली होती, अध्यापही गतवर्षीचे शेकडो शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
विभागीय आयुक्त यांनी व न्यायालय यांनी अन्यायग्रस्त काही शिक्षक शिक्षिका यांना दुरुस्तीने पदस्थापना बदलून द्यावी, असे निर्देश दिलेले आहे, परंतु आचार संहिता असल्यामुळे महिनाभरापासून फाईली ठप्प होत्या. तसेच शासनाच्या निर्देशानुसार रँडम राउंड मध्ये गत वर्षी गेलेले शिक्षक यांना पदस्थापना बदलून मिळणे आवश्यक आहे. त्यावरही निर्णय प्रशासन स्तरावर अध्याप झाला नाही, विस्थापित पदवीधर शिक्षकांचाही दुरुस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहेत , गेल्यावर्षीच्या अन्यायग्रस्त विस्थापित एकल महिला शिक्षकांना न्याय मिळण्याचा सर्व प्रश्न अनुत्तरित असतांना यंदा शिक्षक बदल्यात गेल्यावर्षी संवर्ग दोन मधून पतिपत्नी एकत्रिकरण अंतर्गत 30 किमी बाहेरील शिक्षक जोडप्यांनी शासन निर्णय नुसार एकत्रीकरणचा लाभ घेतला होता आता त्यापैकी गत वर्षी जोडप्यातील एकाने सूट घेतली त्याला यावर्षी बदलीपात्र ठरले आहे.
जोडप्यातील एकाची बदली होणार आहेत त्यामुळे पतिपत्नी विस्थापित होणार आहेत, एकत्रीकरण हवं असेल तर दोघांनी पुन्हा एक युनिट करून पसंती ची शाळा निवडावी असे निर्देश शासनाने दिले असल्याचे आज जिप शिक्षण अधिकारी जैस्वाल साहेब यांनी आदर्श शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले , जि.प. स्तरावर आम्ही काहीही बदल करू शकत नाही हा शासनाचा निर्णय आहे, असेही त्यांनी सांगितले , याच बरोबर बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सेवा जेष्ठता याद्या, तसेच सुगम दुर्गम शाळा, समानीकरणं रिक्त ठेवलेल्या जागा , बदली पात्र व अपात्र शिक्षक यादी, महिला साठी अवघड क्षेत्र घोषित केलेली शाळा यादी , संवर्ग 1,2,3 लाभार्थी यादी जि.प. व पं.स. कार्यालयाच्या दर्शनीय भागावर प्रसिद्द करावी ,जेणेकरून जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका यांना बदली संदर्भात माहिती समजेल व बदली प्रक्रियेत पारदर्शकताही येईल, बोगसगिरी होणार नाहीत, अशा मागणीचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी यांना शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment