Monday, May 6, 2019

आपल्या कमाईतला काही वाटा समाजासाठी वापरूया :डॉ. अशोक माळी

जत,(प्रतिनिधी)-
समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास स्वत:बरोबरच समाजाचीही उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कमाईतील काही थोडा वाटा समाजासाठी वापरण्याची सवय युवकांनी लावून घ्यावी, असे आवाहन डॉ. अशोक माळी यांनी जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील सत्यम फौंडेशनच्या प्रथम वर्धापननिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी महादेव हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एन. गडीकर होते.

     सत्यम फौंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाप्रसंगी फौंडेशनच्या वेबसाईटचे आणि लोगोचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सरकारी नोकर्या संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता युवकांनी शेती आणि उद्योग क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी बोलताना केले. श्री. ऐनापुरे यांना साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षण, साहित्य, शेती, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महादेव गडीकर, मच्छिंद्र ऐनापुरे, प्रशांत गेज्जी, त्रिवेणीकुमार कोरे (कोल्हापूर), सिद्राया बिरादार यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविक सागर कागवाडे यांनी केले. सूत्रसंचालन बी. आय. हिरगोंड यांनी आभार संतोष गडीकर यांनी मानले.
यावेळी सरपंच इरगोंडा लोहगाव, उपसरपंच अशोक हिरगोंड, पोलिस पाटील भीमाशंकर हिरगोंड, माजी सरपंच लिंगाण्णा हिरगोंड, बी.एम. सुतार, सुनील सामंत, अमित बामणे, मुर्गेश काळगी, मल्लेश खोत, हणमंत पवार, प्रमोद खोत,सचिन बडूर, उदय पाटील, महांतेश गडीकर, डॉ. संगीता हिरगोंड, निकिता फडतरे, विश्‍वनाथ पाटोळे, मल्लिकार्जुन निडोणी, प्रवीण सुतार, मोहन संत्ती, शंकर हिरेमठ, प्रीतम नागराळे, सचिन होनमोरे, अनिल कोळी यांच्यासह महादेव विद्यालयाचे शिक्षक, रावळगुंडवाडी, उंटवाडीचे ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment