Sunday, May 19, 2019

पबजी गेमचे तरुणांना वेड; मनोरूग्ण होण्याचा धोका


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील आणि तालुक्यातील तरुण ऑनलाइन पबजी मोबाइल गेमच्या आहारी जात असल्याने तासंतास मोबाइल घेऊन बसत असून याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोबाईलचा अधिक वापर आणि पबजी गेमचे वेड यामुळे युवा वर्ग मनोरुग्ण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

  बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत आहेत. आधुनिक युगात स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे. वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीत इंटरनेट सेवा उपलब्ध केल्याने सध्या ऑनलाइन गेमची क्रेझदेखील वाढली आहे. यामुळे लहान मुले अक्षरशः तहानभूक विसरून व्यस्त असल्याचे दिसत आहे. फक्त शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही या गेमचा ओढा वाढल्याचे दिसत आहे. लहान मुलेच नव्हे तर युवकदेखील या गेमच्या व्यसनात अडकत आहेत.पबजी गेम हिंसकतेकडे नेत असल्याचे चित्र आहे.
मोबाइल गेममुळे विविध आजारांनाही निमंत्रण मिळत आहे. मोबाइल गेममुळे मानेचे आजार, डोळ्यांचे आजार, मनोविकृती चिडचिडेपणा करणे, लक्ष न लागणे, बेचैनी, झोप न लागणे, एकांतात राहणे, तहानभूक विसरणे अथवा योग्यवेळी जेवण करण्याचे टाळणे अशा अनेक प्रकारची लक्षणे ही लहान मुलांमध्ये दिसून येत असल्याने वारंवार केलेल्या तज्ज्ञांच्या संशोधनावरून सिद्ध झाले आहे. यामुळे पालकांनी अशा ऑनलाइन मोबाइल गेमपासून आपल्या मुलांना लांब ठेवणे योग्य आहे.
आणि या मोबाईलचा अधिक वापर आणि गेमचे वेड याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. मागील वर्षी ब्लु व्हेल गेमने पालकांमध्ये दहशत माजवली होती. त्यानंतर पोकेमॉन गेममध्ये तरुण पोकेमॉनच्या शोधात वणवण भटकताना दिसले. आता पबजीने सर्वांना वेड लावले असून अशा गेमच्या नावाखाली मुलांचे बळीदेखील गेले आहेत. त्यामुळे अशा धोकादायक ऑनलाइन गेमपासून दूरच राहायला हवे, असा सल्ला डॉक्टर देताना दिसत आहेत.
तसेच अनेक तरुण मुले, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, व्यापारी रिकाम्या वेळेत गेम खेळतांना सहज दिसत आहेत. तर मुले शाळा, कॉलेज, खाणे-पिणे सोडून तासंतास पबजी खेळत बसत असल्यामुळे डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील वर्षात मोबाइल डेटा कमी दरात उपलब्ध होत असल्याने गल्लोगल्ली मुले मोबाइल घेऊन बसल्याचे दिसून येत. परिणामी काही विद्यार्थी चक्क परीक्षा कालावधीमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन गेम खेळत असल्याने याचा
झुकत असल्याने त्याचा विपरीत परिणाम मुलांवर होत आहे.तरुणाईला तर याचे व्यसनच जडले की काय असा प्रश्न निर्माण झाला असून तासंतास कामधंदे सोडून अनेकजण या गेमच्या आहारी जात असल्याने डोळ्यांचे, मनोरुग्ण, मानेचे आजार यासह विविध आजार जास्त मोबाइलचा वापर केल्याने मुलांना होऊ शकतात. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना अशा ऑनलाइन गेमपासून वेळीच सावध ठेवण्याची गरज असून याचे मोठे दुष्परिणाम टाळणे आवश्यक आहे.
मोबाइलचा अतिवापर शरीरास घातक
मोबाइलचा जास्त चुकीचा वापर करुन गेमच्या आहारी गेल्याने विध्वंसक प्रवृत्ती वाढीस लागून, कल्पनाशक्ती व विवेक कमी होऊन अभ्यासात अडथळा निर्माण होईल. सहनशीलता कमी होईल परिणाम डोळे जाऊ शकतात, मानसिक रोगी होऊ शकतात व मुले वाईट मार्गास जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही माध्यामाचा मुलांनी सकारात्मक वापर करावा व पालकांनी मुलांच्या हालचालीकडेे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणे गरजेचे असून, हा गेम अतिशय धोकादायक असून, विद्यार्थ्यांचा वेळ खर्ची होऊन, त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. मुलं आक्रमक बनतात त्यामुळे पालकांनीसुद्धा लक्ष देऊन, मुलाच्या हालचालीवर लक्ष वेधले पाहिजे. तसेच कोणत्याही माध्यमांचा सकारात्मक विचार करून, त्याचा योग्य फायदा व उपयोग केला पाहिजे.

No comments:

Post a Comment