Sunday, May 12, 2019

दरीबडची येथील अवैध धंदे बंद करा; ग्रामस्थांनी दिले निवेदन


जत,(प्रतिनिधी)-
दरीबडची (ता. जत) येथे गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाले असून याचा ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत असून हे बंद करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जत पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर आनंद पाटील, हरिबा कांबळे, सुभाष माने, कृष्णा चव्हाण, जोतिबा जाधव, संतोष कांबळे, सुरेश घागरे, तानाजी गेजगे यांच्या सह्या आहेत.

त्यांनी म्हटले आहे की दरीबडची येथे गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात शिंदी, मटका, जुगार आधी धंदे जोमाने सुरू आहेत. हे धंदे बंद करण्यात यावे, यासाठी आम्ही अनेक वेळा निवेदन दिले आहेत. मात्र कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. या अवैध धंद्यांमुळे रात्रीअपरात्री मोठ्या प्रमाणात होत असून अनेक ग्रामस्थ महिला असताना त्यांना प्रचंड त्रास होत आहे. याची दखल घेऊन तातडीने हे धंदे बंद करावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे

No comments:

Post a Comment