जत,(प्रतिनिधी)-
अकराव्या वर्गाच्या परीक्षेच्या पद्धतीत यंदापासून बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षा पद्धतीप्रमाणेच आता अकरावीची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावीचा अभ्यासक्रम आणि त्यानुसार पाठय़पुस्तके बदलली आहेत.
राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावीच्या अभ्यासक्रम आणि त्यानुसार पाठय़पुस्तके बदलली आहे. अभ्यासक्रमातीत बदलानुसार परीक्षेचा पॅटर्न ही बदलण्यात येणार आहे. बारावीसाठी तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीच्या गुणांची पध्दत रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्रात्यक्षिक असलेले विषय सोडून इतर सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. फिजिक्स, केमिस्ट, बॉयोलॉजी, भूगोल, मानसशास्त्र यांची प्रात्यक्षिके ३0 गुणांची राहतील. लेखी परीक्षा ७0 गुणांची घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात जून २0१९ पासून हा बदल लागू होणार आहे.
दहावीची तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन बंद केल्यामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडतील, अशी ओरड शिक्षक व पालकांकडून होत आहे. अंतर्गत मूल्यमापनामध्ये शाळा व कॉलेजकडून सडळ हाताने गुण दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी लक्षात येत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर ज्युनिअर कॉलेज व शाळांनी तोंडी मूल्यांकन पद्धती बंद केली आहे.
No comments:
Post a Comment