जत,(प्रतिनिधी)-
मेंढीगिरी ( ता.जत ) येथील मरुगुबाई देवीची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ९ ते ११ मे २०१९ दरम्यान तिन दिवस भरविण्यात येणार आहे .यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती यात्रा समिती व्यवस्थापक आकाराम चव्हाण , पुंडलिक काळे व रुद्राप्पा चव्हाण यांनी दिली .
नऊ मे रोजी जत ते मेंढेगिरी दरम्यान देवीच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे .१० मे रोजी देवीस अभिषेक व गंध कार्यक्रम होणार आहे . रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान किच कार्यक्रम होणार आहे . ११ मे रोजी धावणे शर्यत , सायकल शर्यत , दगड उचलले व जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे .
या कार्यक्रमासाठी जत तालुका काँग्रेस नेते विक्रम सावंत , तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार , पंचायत समिती सभापती सुशिला तावशी , जत नगर पालिका नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार , उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार , बांधकाम समिती सभापती नामदेव काळे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित राहाणार आहेत.
No comments:
Post a Comment