Friday, May 17, 2019

गैरसोय झालेल्या शिक्षक बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे : अभिजित राऊत


जत,(प्रतिनिधी)-
 रँडम राऊंडमध्ये गैरसोयीच्या ठिकाणी बदली झालेल्या शिक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे सोयीनुसार होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली असल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्य नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांनी दिली.

मागील वर्षी 27 फेब्रुवारीच्या शासन आदेशानुसार संगणकीय प्रणालीद्वारे अनेक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बदलीने सांगली जिल्हा परिषदेकडे हजर झालेल्या शिक्षकांच्या सुद्धा रँडम राऊंडनुसारच गैरसोयीच्या बदल्या झाल्या होत्या या बदल्यांम ध्ये अनेक शिक्षकांच्या गैरसोयी झाल्या असून रँडम राऊंड मधील शिक्षकांना सोयीनुसार बदली द्या, अशा पद्धतीचे मागणी वारंवार शिक्षक संघाकडून केली जात होती. 28 जून 2018 च्या शासन आदेशानुसार रँडम राऊंडमध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या सोयीनुसार बदल्या करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आले आहेत. सांगली जिल्हा परिषदेने कार्यवाही केलेली होती. आता या शिक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे सोयीनुसार होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी शिक्षक संघाचे राज्य नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना दिली.
जिल्हांतर्गत बदलीचे पोर्टल नव्याने सुरू होणार असून तशा शासनाच्या सूचना जिल्हा परिषदेला मिळाल्या आहेत. या वर्षीच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे होत असताना मागील वर्षी रँडम राऊंडमध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या सोयीनुसार बदल्या करण्याची कार्यवाही सुद्धा संगणकीय प्रणालीद्वारे केली जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. मागील वर्षी टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोनमधील आंतरजिल्हा बदली झालेले काही शिक्षक इतर जिल्हा परिषदांकडून सांगली जिल्हा परिषदेकडे हजर होणार आहेत. हे शिक्षक खुल्या प्रवर्गातील असून खुल्या प्रवर्गाचा जागा सांगली जिल्हा परिषदेकडे रिक्त नाहीत. या शिक्षकांना कार्यमुक्त करू नका, अशा पद्धतीच्या सूचना सांगली जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग, रायगड, सातारा जिल्हा परिषदांना मागील वर्षी दिल्या होत्या. परिणामी मागील वर्षी या शिक्षकांना या जिल्हा परिषदांनी कार्यमुक्त केले नव्हते.
यावर्षी सांगली जिल्हा परिषदेमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाल्या असल्याने सांगली जिल्हा परिषदेकडे आंतरजिल्हा बदलीने हजर होऊ इच्छिणार्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी लेखी पत्र या जिल्हा परिषदांना सांगली जिल्हा परिषदेने द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रोस्टरनुसार (बिंदूनामावली) रिक्त पदे पाहून त्यानुसार संबंधित जिल्हा परिषदांना खुल्या प्रवर्गातील शिक्षक कार्यमुक्त करण्याचे लेखी पत्र देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांना दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर, शिक्षक संघाचे राज्य नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल माने, युवा नेते शंभूराजे ऊर्फ धैर्यशील पाटील, प्रसाद जाधव, दादासाहेब जाधव, अमोल मिसाळ, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment