जत,(प्रतिनिधी)-
दरीबडची
(ता जत) येथे जोतिर्लिंग दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या
वत्तीने चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. या चारा छावणीत
449 जनावरे दाखल झाले आहेत. चारा छावणीचे उदघाटन
संख येथील अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
पूर्व
भागातील दरीबडची परिसरात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाअभावी खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. जनावरांच्या
चार्याची टंचाई झाली आहे. शासनाच्या जाचक
अटीमुळे चारा छावणी सुरु झाली नव्हती. अटी काही प्रमाणात शिथिल
केल्याने चारा छावणी सुरु झाली आहे. सिध्दनाथ फाट्यावर ही चारा
छावणी सुरु करण्यात आली आहे.चारा छावणीत लहान 73 व 376 मोठी अशी एकूण 449 जनावरे
दाखल झाली आहेत. सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द,
दरीकोणूर, लमाणतांडा (दरीबडची),
खंडनाळ, पांढरेवाडी या गावांना याचा फायदा होणार
आहे. त्यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त
होत आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास विकास सोसायटी चेअरमन लक्ष्मण
पाटील,
आनंदराव पाटील, माजी सरपंच सिध्दू माळी,
सोसायटीचे संचालक प्रशांत जामगोंड, इसरय्या स्वामी,
सगन मासाळ, ग्रामपंचायत सदस्य सावंत, जोतिबा जाधव, माजी उपसरपंच रावसाहेब जामगोंड,
दरीकोणूर विकास सोसायटी चेअरमन व माजी सरपंच विश्वास भोसले, तिल्याळचे माजी सरपंच नितीन पाटील व बहुसंख्य
ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment