Friday, May 31, 2019

शनी कथा आणि इतिहास

शनी ग्रह मंदगतीने फिरणारा म्हणून त्याला शनैश्‍वर हे एक नाव मिळाले. शनी ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास साधारण ३0 वर्षे घेतो. या कालावधीत तो १२ राशींतून पार होतो. म्हणजे एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतो. फलज्योतिषानुसार तो तुमच्या आधीच्या राशीत आला की, तुमच्यावर अडीच वर्षे, मग तुमच्या राशीत आल्यावर आणखी अडीच वर्षे व पुढच्या राशीत गेल्यावर तिसरी अडीच वर्षे अशी एकूण साडेसात वर्षे प्रभाव गाजवतो. हीच साडेसाती होय. ती नशिबी आल्यावर शनिदेव रावाचा रंक बनवू शकतो, पण तो जसा मारक आहे तसा तारकही आहे. सदाचारी, कर्ममार्गी माणसांचे कल्याण करतो, पण त्याला उपेक्षा केलेली अजिबात सहन होत नाही. टिंगलटवाळी करणारा माणूस एरवी कितीही थोर असला तरी हा देव त्याचे हालहाल करून सोडतो. म्हणून त्याची आराधना केली जाते. शनिदेवाची प्रतिमा, लीला, कौटुंबिक पार्श्‍वभूमी वगैरेंची माहिती पुराणे, फलज्योतिष व शनिमाहात्म्यासारख्या पोथ्या व र्शावणी शनिवारच्या कहाण्या यातून मिळते.
श्री शनिदेवाची जन्मगाथा उत्पत्ती संदर्भात वेगवेगळ्या कथा आहेत. श्री शनिदेवाची सर्वात प्रचलित उत्पत्ती गाथा स्कंध पुराणातील काशी खंडात अशा प्रकारची आहे. श्री शनैश्‍वरच्या वडिलांचे नाव सूर्यदेव व आईचे नाव संज्ञा होते. संज्ञा ही ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याची कन्या होती. संज्ञा ही फारच स्वरूपान व रुपवती कन्या होती. दक्षाने आपल्या कन्येचे लग्न सूर्याशी करून दिले. संज्ञा सूर्यदेवाचे तेज सहन करू शकत नव्हती. सं™ोला असे वाटत होते की , मी स्वत:च तपश्‍चर्या करून तेज वाढवावे म्हणजे सूर्याचे तेज सुसह्य होईल. परंतु, सूर्याची ती पतिव्रता नारी होती. सूर्यामुळे सं™ोला तीन अपत्य झाली १) वैवस्वत मनु २) यमराज ३) यमुना.
संज्ञा आपल्या मुलांवर खूप प्रेम करीत होती, परंतु सूर्याचे तेज सहन करू शकत नव्हती. एके दिवशी संज्ञाने विचार केला की सूर्यापासून वेगळे होऊन आपल्या माहेरी जाऊन तिथे तपश्‍चर्या करू अन् तिथेही विरोध झाला तर दूर कुठे तरी एकतांत जाऊन तपश्‍चर्या करू. प्रथम संज्ञाने आपल्या तपश्‍चर्येने आपल्या सारख्याच दिसणार्‍या एका छायेची निर्मिती केली जिचे नाव सुवर्णा ठेवले. सुवर्णाला आपल्या मुलांची जबाबदारी सोपवताना संज्ञा म्हणाली, 'सुवर्णा आजपासून माझ्या ऐवजी तू नारी धर्म संभाळ, अन् माझ्या मुलाबाळांचे पालन पोषण तू स्वत: कर. हे करताना जर काही अडचण आली, तर मला बोलव, मी लगेच येईन, पण एक गोष्ट लक्षात ठेव तू सुवर्णा आहेस संज्ञा नाहीस हे रहस्य कुणालाही कळता कामा नये.'
संज्ञा सुवर्णाला आपली जबाबदारी सोपवून माहेरी निघून गेली. घरी गेल्यावर वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. ऐकताच वडिलांनी संज्ञाला रागवून फटकारले की, 'न बोलविता मुलगी जर माहेरी आली तर तो दोष पिता-पुत्रीला लागतो. म्हणून तू लगेच आपल्या सासरी सूर्याजवळ जा.'
संज्ञा मनात विचार करायला लागली की जर मी परत गेले तर माझ्या छाया-सुवर्णाला जे कर्तव्य सोपविलेले आहे त्याचे काय होणार? ती कुठे जाणार? शेवटी आमच्यातले रहस्य बाहेर येणार. शेवटी ती निब्बिड वनात जो उत्तर कुरुक्षेत्र आहे तिथे शरण गेली. आपल्या सौदर्यांची व यौवनाबद्दल तिला भीती वाटत होती. म्हणून तिने 'बडवा घोडी' रूप धारण केले ज्यामुळे तिला कुणी ओळखणार नाही. मग ती तपश्‍चर्याला लागली. इकडे सूर्य व छाया-सुवर्णाला तीन मूले झाली. पती पत्नी एकमेकाबरोबर खूप प्रेम करीत. त्यामुळे सूर्याला शंकेचे कारणच नव्हते. यांच्या मुलांची नावे अशी - १) मनु २) श्री शनीदेवा ३) पुत्री भद्रा (तपती).
श्री शनिदेवाच्या उत्पत्ती संदर्भात दुसरी कथा अशी की, श्री शनिदेवाची निर्मिती महर्षी कश्यपच्या यज्ञातून झाली. जेव्हा शनि छाया-सुवर्णाच्या गर्भात होता तेव्हा शिव भक्तीने सुवर्णा ने शिवाची इतकी तपश्‍चर्या केली की, ती आपले खाण पिणं सुद्धा विसरून जात असे. तिच्या अशा तपश्‍चर्येमुळे गर्भातच शनीचा रंग काळा झाला. शनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्यदेव शनीचा काळा रंग पाहून हैराण झाले. सुर्याला सुवर्णाची शंका आली, अन् लगेच सूर्याने सुवर्णाचा अपमान करीत सांगितले की हा मुलगा माझा नाही.
श्री शनिदेवाच्या अंगात जन्मत: आईच्या तपश्‍चर्या शक्तीचे बळ होते. त्यांनी पहिले की माझे वडील आईचा अपमान करीत आहेत. त्यांनी क्रूर नजरेने पित्याकडे पाहिले, पाहताच त्यांच्या वडिलांच्या शरीराचा रंग सुद्धा काळा झाला. घोडे चालण्याचे थांबले, रथ पुढे चालू शकला नाही, हैराण झालेल्या सूर्यदेवाने शिवाची आराधना सुरू केली, तेव्हा शिवाने सूर्याला सल्ला दिला की, तुमच्याकडून मुलगा व स्त्री दोघांचाही अपमान झाला. यामुळे दोष लागला. लगेच मग सूर्यदेवाने माफी मागितली. परिणामी पुन्हा सूर्यदेवाला सुंदर रूप प्राप्त झाले व घोडे चालायला लागले. तेव्हापासून श्री शनिदेव वडिलांचे विद्रोही, शिवचे भक्त व माता यांना प्रिय आहे. जनमानसात असे समजतात की सूर्यमालेत जो शनि आहे, तोच श्री शनिदेवाचे प्रतिक आहे. शनिग्रह दगड व लोखंडापासून बनलेला आहे ज्याच्या वरती बर्फाचा थर व द्रवरूप हायड्रोजन मात्रा आहे. शनीचे तेजोवलय ६२000 की.मी. रुद्र व स्थूल रुपाने १00 मीटर आहे.
आपल्या दैनदिन जीवनात आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शनीचे प्रभुत्व आपल्यावर आहे. बाळाचा जन्म होताच कुटुंब सदस्यांना वाटते की, आई वडिलांच्या किंवा बाळाच्या राशीत शनि कसा आहे? कुठल्या पायाने मुलाचा जन्म झाला आहे. यावरून ही शनीच्या शुभाशुभ फळावरून चांगला-वाईट ची ओळख करतात. आपल्या शरीरात लोह तत्वाचा स्वामी शनि आहे. शनि कमजोर, दुर्लब झाल्यास शनीचा प्रकोप, शनिची पिडा यावरून शरीरात लोहाची कमतरता समजावी. लोह तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी व्यक्तीला दुर्बल (कमजोर), अशक्त करतात.
शनिदेवाला संतुष्ट करण्याचे अनेक मार्ग धार्मिक ग्रंथांनी सांगितले आहेत. शनिमाहात्म्य पोथीत, नतमस्तक झालेल्या राजा विक्रमादित्याला शनी बजावतो, 'जो कुणी माझी ही कथा पठण करील, र्शवण करील त्याला मी नडणार नाही. पण जे या कथेचा अपमान करतील त्यांना छळल्याशिवाय राहणार नाही.' अन्य सोपे उपायही उपलब्ध करून दिलेले आहेत. उदाहरणार्थ, सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय:। मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।। या मंत्राचे पठण करावे. 'ओम शं शनैश्‍चर्यये नम:' असे रोज १0८ वेळा म्हणावे. 'ओम प्राम् प्रीम प्रुम स: शनैश्‍वराय नम:।' हा तांत्रिक मंत्र जपावा. हनुमान शनीचा उपकारकर्ता आहे. म्हणून 'हनुमान चालिसा' वाचल्याने व पंचमुखी हनुमानाची आराधना केल्याने शनीला प्रसन्न करता येते. कालिमाता, विष्णू-कृष्ण यांची पूजासुद्धा शनीला प्रिय आहे. म्हणून 'ओम नमो नरनारायणाय।' व 'हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे' हे मंत्र जपावे. शिवाय उपासतापास, दानधर्म आहेतच.

No comments:

Post a Comment