जत,(प्रतिनिधी)-
सांगली
जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी संख (ता जत) येथील गुरुबसव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील
प्रा. सुभाष मल्लकाप्पा बिरादार यांची निवड करण्यात आली आहे.
तत्कालीन
संचालक बाबूराव खवेकर सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ही जागा रिक्त
झाली होती. नूतन सदस्य प्रा. सुभाष बिरादार
यांचा सत्कार चेअरमन संगीता लाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी
पॅनेलप्रमुख एच. के. होर्तीकर, व्हाईस चेअरमन तानाजी गायकवाड, सचिव संभाजी लक्ष्मण माने,गणपती शेवाळे, शिवाजी देसाई, रमेश
बाबूराव लाड, विलास यमगर, कुमार माने संजय
वांगेकर, तज्ज्ञ संचालक सुभाष सावंत, मुख्य
व्यवस्थापक शिवप्रसाद हिरेमठ व सर्व संचालक उपस्थित होते. सभासद
सर्व अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे.संस्थेचा पारदर्शी कारभार व सभासद हितजपण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे,
असे आश्वासन नूतन संचालक प्रा. बिरादार यांनी दिले.
No comments:
Post a Comment