Sunday, May 12, 2019

सामान्य उद्योजगता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम लाभार्थींसाठी सामान्य उद्योजकता विकास या प्रशिक्षण सत्राचा निरोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे के.व्ही.आय.सी.चे असिस्टंट डायरेक्टर पी. एस. वेद यांनी प्रशिक्षणर्थीशी संवाद साधताना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

बीओआय स्टार सांगली, आरसेटी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणींना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यात यावा व बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सांगली केव्हीआयसी, केव्हीआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे 10 दिवसांचा सामान्य उद्योजगता विकास हा कार्यक्रम झाला. प्रशिक्षणार्थीमध्ये आत्मविश्वास वाढवा, त्यांना प्रेरणा मिळावी, एक कुशल उद्योजक कसा बनता येईल, बँकेमध्ये कसे व्यवहार करता येतील, प्रकल्प अहवाल, व्यवसायामध्ये येणार्या अडचणी कशा सोडवता येतील, विपणन व्यवस्थापन, बाजारपेठ सर्वेक्षण महत्त्व याविषयी सुद्धा सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वी उद्योजकाना स्थळभेटी सुद्धा करण्यात आल्या. या कार्यक्रमाला उद्योगजगतातील विविध मान्यवरांनी संपूर्ण 10 दिवस मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी आरसेटी प्रशिक्षणाची स्तुती केली. यावेळी प्रशिक्षणर्थी विठ्ठल चोपडे म्हणाले, आम्हाला उद्योग कसा करावं, हे माहीत नव्हते. मात्र आरसेटीमध्ये अनेक मान्यवरांनी बारीकसारीक गोष्टी सांगून अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले. असे प्रशिक्षण देणे व घेणे महत्त्वाचे असून स्पर्धेच्या युगात टिकणे शक्य होईल.

No comments:

Post a Comment