जत,(प्रतिनिधी)-
गतवर्षाच्या 'सत्यमेव जयते वाटर कप' स्पर्धेत यश मिळवलेल्या जत तालुक्यातील पाच गावांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जत येथे समारंभपूर्वक देण्यात आले.
जत तालुक्यातील अनेक गावांनी जलसंधारणाचे काम उत्कृष्टरित्या केले आहे. त्यात मोकाशेवाडी, लवंगा, हिवरे,जालिहाळ खुर्द,कुलाळवाडी,या गावांनी बक्षिसदेखील मिळवली. या गावांना आणखी प्रोत्साहन मिळावे,यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने प्रत्येकी गावांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत,जत तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराय बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग, माजी सभापती संतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँक तालुका विभागीय अधिकारी राजू कोळी, राम पाटील, सर्व बँकेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
( वॉटर कप स्पर्धेत यश मिळवलेल्या गावांना जिल्हा बँकेमार्फत 25 हजारांचे बक्षीस वाटप करताना विक्रम सावंत, आप्पाराय बिराजदार,बाबासाहेब कोडग आदी उपस्थित होते.)
No comments:
Post a Comment