जत,(प्रतिनिधी )-
शहरातील सातारा रस्त्यानजीक पारधी तांडा येथील अटक वॉरंट असलेल्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या दोघा समर्थकांनी हल्ला केला. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. प्रवीण शहाजी पाटील असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
याबाबत सुभाष दिलीप काळे (वय 45, रा. पारधीतांडा, जत) याच्या विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हल्लेखोर फरारी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत शहरातील पारधी तांड्यातील विविध गुन्ह्यांत आरोपी असलेला सुभाष काळे याच्या विरोधात न्यायालयाने तीन अटक वॉरंट बजावले होते. पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील व संदीप सांळुखे यांना सुभाष काळे हा निदर्शनास आला. त्यांनी काळे याला पोलिस ठाण्याला यावे लागेल, असे सांगताच काळे यांनी ‘मी तुमच्याबरोबर येणार नाही, काय करायचे ते करा’ असे म्हणून जमाव जमवून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर तो पळून जाऊ लागला. त्यावेळी कॉन्टेबल प्रवीण पाटील यांनी त्याला पकडले. त्यातून त्याने पोलिसांना हिसका देऊन पळ काढला.दरम्यान पाटील व सांळुखे यांनी त्याचा पाटलाग केला. त्यावेळी काळे याच्या समर्थकांनी पोलिस पाटील व सांळुखेवर हल्ला केला.पाटील यांना काठ्यानी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर ते पळून गेले.
दरम्यान, कॉन्टेबल पाटील यांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारार्थ मिरज येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान सुभाष काळे व अन्य 2 अनोळखी वयोगटातील युवकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा, पोलिसावर हल्ला आदी कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करीत आहे.
No comments:
Post a Comment