Friday, May 10, 2019

दुष्काळ योजना न राबविल्यास 14 रोजी रास्ता रोको

जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डफळापूरला पाच रुपयाला एक घागर पाण्याची घागर मिळत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा  टँकर व चारा छावण्या सुरु करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा 14 मे रोजी डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड हणमंत दत्तात्रय कोळी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डफळापूरमध्ये सध्याच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न खुप भयानक झाला आहे. डफळापूरसाठी अनेक पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत,पण एकही योजना यशस्वी झाली नाही.परिसरात पाणीच नसल्याने लोकांना अख्खा दिवस पाण्यासाठी घालवावा लागत आहे. सध्या पाणी विकणारयांची चंगळ चालली आहे. तीन रुपयांना मिळणारे घागरभर पाणी आता पाच रुपयांना मिळत आहे. ज्यांची ऐपत आहे,ते लोक विकतचे पाणी घेत आहेत, पण सर्वसामान्य लोकांना मात्र पाण्यासाठी भटकंतीच करावी लागत आहे.
 याशिवाय गायी म्हशीबरोबर शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, प्रति माणशी पाणी पुरवठा वाढविण्याबरोबर प्रति जनावर पाणी पुरवठा होण्याची आवश्यकता आहे, रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करण्यात यावीत, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांची पूर्तता न झाल्यास 14 मे रोजी सकाळी अकरा वाजता डफळापूर बसस्थानाकासमोर रास्ता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment