जत,(प्रतिनिधी)-
पावसाळ्याला
एक महिन्याचा अवकाश असला तरी देखील जत तालुक्यातील शेतकरी आता खरिपाचे नियोजन करीत
असून खरीप पूर्वमशागतीला आता सुरुवात झाली आहे. ट्रॅक्टर व बैलजोडीने
खरीप पूर्वमशागतीची कामे सुरू झाली आहेत.
अत्यल्प भूधारक व गरीब शेतकरी पारंपरिक पद्धतीने
म्हणजेच बैलजोडीने नांगरणी करताना दिसून येत आहे, तर मध्यमवर्ग
दोन शेतकर्यांनी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी सुरुवात केली आहे.
जत तालुक्यात तापमानाने 42-43 अंशापर्यंत उच्चांक
गाठला आहे. या भागातील शेतकर्यांनी खरीपपूर्व
शेतीच्या मशागतीला सर्वात केली आहे. मे महिन्यात वादळी वारे व
पाऊस पडण्यापूर्वी मशागतीची कामे उरकून घेत आहेत. गेल्या वर्षी
पावसाने खरीप हंगामात दडी मारली होती. त्यामुळे उत्पादनात घट
झाली होती. पुढील हंगाम तरी साथ देईल का, या आशेवर शेतकरी मशागतीची कामे उरकत आहेत. पावसाळा लांबणार
असला तरी मे महिन्यातच अनेक शेतकरी खरीपपूर्व मशागतीला प्राधान्य देत आहेत.
No comments:
Post a Comment