रासपचे पालकमंत्र्यांना निवेदन
जत,(प्रतिनिधी)-
फळबागा व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, खरिपाचे अनुदान शेतकर्याच्या खात्यावर तात्काळ जमा होण्याबाबत शेतकर्यांना
चार्यासाठी थेट अनुदान मिळावे, या आशयाचे
निवेदन रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी जत दौर्यावर असलेले पालकमंत्री सुभाष देशमुख यांना नुकतेच दिले.
निवेदनात
म्हटले आहे की, तालुक्यात गारपीट व वादळी वार्याच्या पावसाने रामपूर, मल्हाळ, घाटगेवाडी, येळदरी, खलाटी,
कंठी या भागातील शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे
व फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यामध्ये भयाण
दुष्काळी परिस्थिती असताना शेतकर्यांनी कठीण परिस्थितीत बागा
व पिके जोपासली होती. मात्र गारपिटीने 300 एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील बागा व पिके नष्ट झाली आहेत. यामध्ये अनेक शेतकर्यांच्या द्राक्ष, डाळिंब, पपई या बागांबरोबरच इतर पिकांचे मोठे नुकसान
झाले आहे.
या सर्व शेतकर्यांच्या
पाठीशी राज्य सरकारने खंबीर उभारत तातडीने नुकसान भरपाई द्यावी. आता जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे आणि आता रब्बी सुध्दा
वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत अजून ही शेतकर्यांना खरीप हंगामाच्या पिकांचे अनुदान मिळाले नाही. तात्काळ
खरिपाचे अनुदान शेतकर्यांना बँक खात्यावर देऊन राज्य सरकारने
कंबरडं मोडलेल्या शेतकर्याला आधार देण्याचे काम करावे.
जत तालुक्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. सध्या
जनावरांसहित शेळ्या-मेंढ्यांच्या चार्याचा
प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने शेतकर्यांना चार्यासाठी थेट अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करीत आहोत.
No comments:
Post a Comment