Saturday, November 3, 2018

प्रवासी वाहनांना लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस बसवणे बंधनकारक


जत,(प्रतिनिधी)-
सार्वजनिक प्रवासी वाहनांना आता यापुढे व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस आणि आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. दरम्यान, ही उपकरणे वाहनांमध्ये बसविण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने याबाबतची अधिसूचना 25 ऑक्टोबर रोजी जारी केली आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी व्हेईकललोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस आणि आपत्कालीन बटन असण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील काही आरटीओकडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत प्रवासी वाहतूक चालक मालक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात काही भागात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असली तरी यासाठी काही कालावधीची मुदत द्यायला हवी होती. अधिसूचना आल्या आल्या त्याची अंमलबजावणी योग्य नाही.1 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे लागलीच घाई करून चालणार नाही. याबाबत समाजात प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी आणि जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

No comments:

Post a Comment