जत,(प्रतिनिधी)-
राज्यात 26 नोव्हेंबर ते
2 डिसेंबर दरम्यान ’राज्यघटना सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय,
निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,
सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच कॉलेजांमध्ये
26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत ’राज्यघटना सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहाचा
मुख्य कार्यक्रम मुंबई व नागपूर येथे होईल. या सप्ताहात राज्यातील
अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण
योजनेंतर्गत जमीनवाटप सुरू करण्यात येणार आहे. विविध महामंडळांच्या
लाभार्थींना कर्जवाटप व विभागामार्फत इतर उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
’या सप्ताहामध्ये राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक
शाळा व कॉलेजांतील विद्यार्थी सहभागी होऊन राज्यघटनेच्या उद्देशिकेचे समूहवाचन करतील.
या सप्ताहात राज्यघटनेवर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, प्रश्नमंजुषा, चर्चासत्र आदी कार्यक्रम राबविले जातील.
या सप्ताहानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समाज कल्याण कार्यालय व
जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे व विशेष प्रसिद्धी
मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment