Saturday, November 3, 2018

नीटसाठी अर्ज भरण्यास सुरुवात


जत,(प्रतिनिधी)-
 देशातील सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस अशा वैद्यकीय पदवीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणार्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी (नीट) अर्ज भरायला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.
शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 1 डिसेंबर असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) देण्यात आली आहे. यंदा नीट प्रवेश परीक्षा एनटीएमार्फत 5 मे रोजी घेण्यात येणार आहे. एनटीएकडून परीक्षेची माहिती आणि नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केल्यानंतर ऑनलाइन आणि ई-चलन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम मुदत 1 डिसेंबर आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1400 रुपये शुल्क, तर राखीव प्रवर्गासाठी 750 रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांना 15 एप्रिलपासून एनटीएच्या वेबसाइटहून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा 5 मे रोजी होणार असून, निकाल जूनमध्ये जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थी-पालकांना अधिक माहिती संकेतस्थळावर मिळेल, असे एनटीएकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment