Friday, November 2, 2018

गुगवाड येथे पिकअपच्या धडकेत महिला ठार

जत,(प्रतिनिधी)-
     गुगवाड (ता. जत) येथे गुगवाड- अथणी  रस्त्यावर वज्रवाड फाट्याजवळ  समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने तायव्वा गुरपाद  आवटी (वय ५५ रा.गुगवाड) या जागीच ठार झाल्या.ही घटना शुक्रवारी आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
            याबाबत अधिक माहिती अशी, तायव्वा  गुरपाद आवटी या  गुगवाड- वज्रवाड रस्त्यावरुन शेळी घेऊन जात होत्या. पिकअप गाडीने समोरून धडक दिली.या पिकमध्ये उसतोड मजूर होते.या घटनेवेळी येथील पिकमधील मजुरांनी  उडी टाकली आणि पसार झाले.चालक महादेव चंद्रसेन मुंडे (रा.कोटरकन जि.बीड) येथील असल्याचे  यावेळी स्पष्ट केले. चालकदेखील फरार आहे. या घटनेची नोंद  जत पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस  फौजदार गढवे हे करीत  आहेत.

No comments:

Post a Comment