जत,(प्रतिनिधी)-
राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत जास्तीत
जास्त खेळाडूंना सहभागी होता यावे व त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी भारतीय खेळ महासंघाच्या निर्देशानुसार राज्य क्रीडा
व युवक सेवा संचालनालयानेही यंदाच्या हंगामापासून 14 वर्षाम्खालील
मुलांच्या 55 किलो वजनी गटाऐवजी 50 किलो,
तर मुलींच्या 48 ऐवजी 44 किलो गटात स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार
यापूर्वी घेतलेल्या शालेय ज्यूदो स्पर्धा रद्द करून नव्याने घेतल्या जाणार आहेत.
याबाबत देशातील ज्यूदो संघटनांनी भारतीय
खेल महासंघाकडे दाद मागितली होती. यात पूर्वीप्रमाणे
14 वर्षांखालील मुलांमध्ये 50, तर मुलींमध्ये
44 किलो वजनी गटात शहर, जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत.
खेल महासम्घाने 14 वर्षांखालील गटात 55
तर मुलींमध्ये 48 किलो वजनी गटात स्पर्धा होत असत.
यासह 17 व 19 वर्षांखालील
गटात 36 किलो वजनी गटातही स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
याबाबतचे पत्रक राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने प्रसिद्ध
झाले आहे. त्यानुसार आता नव्याने या आठवड्यात स्पर्धा होणार आहेत.
No comments:
Post a Comment