जत,(प्रतिनिधी)-
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक
संयुक्त महामंडळाच्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान नांदेड येथे होणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते,
तर खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रामदास कदम,
नांदेडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यावेळी उपस्थित
राहणार आहेत. या अधिवेशनात अनुदानित शाळांचे भवितव्य,
शैक्षणिक धोरण व गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रचलित शिक्षणपध्दतीत तंत्रज्ञानाची
आवश्यकता या विषयांवर शोधनिबंध सादर करण्यात येणार आहे. तसेच,
राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा सन्मान,
खुले अधिवेशन, ठराव वाचन आणि समारोप, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment