उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे येई दिवाळी बहरूनी
अंगणात करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा प्रेमच प्रेम पसरूदे मनामनात...
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते,
त्या काळात झाला असा समज आहे. प्राचीन काळी हा
यक्षांचा उत्सव मानला जात असे. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री
असे होते, असे हेमचंद्राने नोंदवले. ‘नीलमत
पुरणया’ ग्रंथात या सणाचा उल्लेख दीपमाला असा आढळतो; तर ‘ज्योतिषरत्नमाला’ या ग्रंथात
या सणाला ‘दिवाळी’ हा शब्द वापरला आहे.
साधारणपणे ऑक्टोबरनोव्हेंबर दरम्यान हा सण येतो. हे दिवस थंडीचे. त्यामुळे या दिवसात आल्लाददायक वातावरण
असते. थंडीत भूक प्रखर असते. अशा वेळेस,
शरीरात प्रथिने व इतर गोष्टींची गरज जास्त भासते. ती दिवाळीच्या फराळातील पदार्थांमुळे भरून निघते.
करंजी: करंजीला शुभ मानतात. त्यामुळे बर्याच जणांकडे फराळाची सुरुवात करंज्यांनी
होते. स्नायू बळकट होतात, अशा गोष्टींचा
समावेश करंजीच्या सारणात होतो. जसे की खोबरे, खसखस, वेलची पूड किंचित जायफळ. करंजी ही रवा आणि मैद्यात करतात. रवा आणि मैद्यामुळेदेखील
शरीर बळकट होण्यास मदत होते. तसेच रव्याने जखम भरून निघण्यास
मदत होते. अशा प्रकारे करंजी ही आरोग्याला फायदेशीर ठरते.
बेसन लाडू व रवा लाडू : हे दोन्ही लाडू शरीरासाठी पौष्टिक आहेत. रव्याने जशी
जखम भरून निघते, तसेच रव्याने ताकदही वाढते. तेव्हा हे दोन लाडू दिवाळीत आवश्यक असून, ते आवर्जून
खावेत. शंकरपाळी : शंकरपाळी हीदेखील पौष्टिक
पदार्थांत येते. शंकरपाळीमधील घटकांनी शरीर बळकट होण्यास मदत
होते.
चिवडा - चिवड्यामध्ये
कढीपत्ता आवर्जून घालावा. चिवड्यातील कढीपत्त्यामुळे खोकल्याचा
त्रास होत नाही. शिवाय दमा लागण्याचे प्रमाण कमी होते.
थंडीत, दिवाळीत अनेक जणांना खोकल्याच्या त्रास
होतो. अशा वेळेस कढीपत्ता फायदेशीर ठरतो.
चिरोटे
- चिरोटे करताना काहीजण त्यात तांदळाची पिठीही घालतात. या तांदूळ पिठीने शरीरयष्टी चांगली राहते. तसेच तांदळाने
हृदयाचे ‘हार्डस बिट’ चांगले राहतात.
त्यामुळे तांदूळ हा हृदयाला चांगला.
अनारसे
- अनारशामध्ये तांदूळ पिठी आणि गूळ असतो. आता तांदूळ
पिठीचे फायदे आपण बघितलेच. आता गुळाचे फायदे बघू. गुळाने शरीरातील शक्ती वाढण्यास मदत होते. गुळातील प्रथिनांमुळे,
काही विशिष्ट घटकांमुळे शरीरात उष्णता वाढते, जी
थंडीत उपयुक्त ठरते. तसेच शरीरयष्टीसाठी-देखील गुळाची मदत होते.
चकली - फक्त चकली नव्हे
तर चकली, चिवडा, शेव या तिखट पदार्थांमुळे
तिखट, मीठ, हळद, धने
हे आपल्या शरीरात मुबलक प्रमाणात जातात. यामुळे आपणास अनेक फायदे
होतात.
हळद
- हळदीने रक्त शुद्ध होते व जखमा भरून निघतात.
तिखट - तिखटाने लाळउत्पत्ती
होते, जी पचनाला आवश्यक आहे. यामुळे शरीराचा
दाह होतो. त्यामुळे मेदही कमी होतो.
धने
- धने हे शांत, शीतल असून, हेदेखील शरीरातील दाह कमी करतात. यामुळे पंचकर्म करावे
लागत नाही. फराळातील लाडू, करंजी,
चिरोटे, अनारसे इ.मुळे शरीरात
मेद वाढतो, तशीच शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.

No comments:
Post a Comment