Thursday, November 1, 2018

शासनाने तातडीने ट्ंचाई निधी उपलब्ध करावी


जत,(प्रतिनिधी)-
सांगली  जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला असून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शासनाने मागील टंचाई निधीच दिला नाही तर यंदाचा तरी कसा मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासनाने तातडीने निधी देऊन शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या वर्षीचे  7 कोटी 28 लाख रूपये शासनाकडून येणे आहे. शासनाकडून केलेल्या प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे राज्यभरात सर्वेक्षण केल्यानंतर अखेर सरकारने राज्यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्यांत गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आज जाहीर केला आहे. जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या पाच गावांचा गंभीर दुष्काळात समावेश केला.
 सन 2017 -18 मध्ये उन्हाळ्यात टंचाईचा सामना जिल्ह्यला करावा लागला होता. त्यावेळी तात्पुरत्या उपाययोजनांसाठी जिल्हात टंचाईसदृश परिस्थिती शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला, त्यासाठी विहीर-बोअर भाडेतत्त्वाने अधिग्रहित केल्या होत्या. यामध्ये शासकीय टँकरचे डिझेलचे टँकरचे भाडे असे एकूण 6 कोटी 55 लाख रूपये, तर खासगी विधंन विहिरींचे भाडे 69 लाख, अधिग्रहित बोअरचे 3 लाख 30 हजार असे एकूण 7 कोटी 28 लाख रूपयांची थकीत रक्कम शासनाकडे आहे. यावर्षी पेरणीनंतर पावसाचा उसंत घेतल्याने पिकांची वाढ खुंटली. पाण्याअभावी पिके करपून गेली आहेत.
पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व या भागात पावसाने पाठ फिरवली. दरवर्षी या भागात परतीचा पाऊस चांगला होतो, बळीराजाही आभाळाकडे डोळे लावून बसला होता, मात्र परतीच्या पावनासेही आता हुलकावणी दिली असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाकडून जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर तर केला, पण अधीच गेल्यावर्षी टंचाईचे 7 कोटी 28 लाख रूपये थकीत आणि यंदाचे पैसे देऊन भरीव मदत करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment