Sunday, November 4, 2018

राजे रामराव महाविद्यालयाने संस्कारक्षम पिढ्या घडविल्या


 पालकमंत्री सुभाष देशमुख
जत,(प्रतिनिधी)-
 राजे रामराव महाविद्यालयाने अनेक संस्कारक्षम पिढ्या घडविल्या असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. जत येथे 2 नोव्हेंबररोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालयात, जत च्या सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन समारंभ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रयोगशाळा इमारत व इनडोअर स्पोर्टस् फॅसिलीटी हॉलचेही उद्घाटन देशमुख यांचे हस्ते झाले. उद्घाटनाचा कार्यक्रम प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. े प्राचार्य डॉ. व्ही.एस ढेकळे स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले की, या महाविद्यालयाची स्थापना 1969 ला अवघ्या 67 विद्यार्थ्यांवर जत संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांच्या दातृत्वातून व डॉ.बापूजी साळुंखे यांच्या अथक प्रयत्नातून झाली. आमदार विलासराव जगताप म्हणाले, मी या महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. सुसंस्कृत व शिस्तप्रिय नागरिक घडविण्यात या महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे. सुभाष देशमुख म्हणाले, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यामुळेच या कॉलेजला आज नावलौकीक प्राप्त झाला आहे. समाज घडविण्यात आज या कॉलेजने मोलाचा वाटा उचलला आहे. या कार्यक्रमासाठी श्रीमंत इंद्रजित राजे डफळे, श्रीमंत शार्दुल राजे डफळे, प्राचार्य डॉ. युवराज भोसले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment