मोकाशेवाडीतील शेतकर्यांचे तहसीलदारांना निवेदन
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील मोकाशेवाडी येथील 74 शेतकर्यांच्या 2009 साली जमिनी
गेल्या असून या जमिनीचा कोणताही मोबदला शेतकर्यांना मिळाला नाही.
याबाबत तालुका प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने सामूहिक आत्मदहन करण्यास
परवानगी मिळावी, यासाठीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात
आले. निवेदनावर शिवाजी गायकवाड, विष्णू
गायकवाड, गुलाब गायकवाड, तानाजी गायकवाड,
बाबासो गायकवाड, हरी गायकवाड, निवृत्ती गायकवाड, पांडुरंग गायकवाड, बाबासो गायकवाड, भिकाजी गायकवाड, पांडुरंग गायकवाड, नंदकुमार गायकवाड, समाधान गायकवाड, उत्तम गायकवाड, गायकवाड, पंडित गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
निवेदनात
म्हटले आहे की, मोकाशेवाडी येथील 74 शेतकर्यांच्या जमिनी बागलवाडी (ता. जत)
येथील साठवण तलावात 2009 साली गेल्या. या शेतकर्यांची कोणत्याही प्रकारची संमती न घेता जमिनीचा
कब्जा घेऊन बांधकामास सुरुवात करून पिकासह माती उचलून तलावाचे 70 टक्के बांधकाम पूर्ण करण्यात आले. बांधकामावर तीन कोटी
36 लाख रुपये खर्च केला असून हे बांधकाम अर्धवट सोडून संबंधित ठेकेदाराने
पलायन केले आहे.
या प्रकल्पामध्ये
मोकाशेवाङी ग्रामपंचायत हद्दीतील बागायत व जिरायत जमिनीतील तलावाच्या बांधकामासाठी
माती उचलल्याने सन 2009 पासून या शेतकर्यांना शेतीतून उत्पन्न मिळण्याची साधन नष्ट झाले आहे. 74 शेतकर्यांच्या जमिनी बागलवाडी येथील साठवण तलावात गेल्या
आहेत. येथील शेतकर्यांना एक दमडीही मिळाली
नाही. त्यामुळे या गावातील 74 शेतकर्यांनी कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून याची दखल शासनाने
घ्यावी, या आशयाचे निवेदन दिले आहे.
No comments:
Post a Comment