जत,(प्रतिनिधी)-
एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईसह पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे त्रस्त झाला आहे. त्यातच आता
शेतकर्यांसमोरही या महागाईने मोठी अडचण निर्माण केलीय.
मागील 3 महिन्यात खतांच्या किमतीत 15 ते 20 टक्के दरवाढ झाल्यामुळे शेतकर्यांना खतांसाठी सबसिडी देण्यात यावी, अशी मागणी करजगी
सोसायटीचे चेअरमन विठ्ठल मलप्पा हंजगी यांनी केली आहे.
खतांच्या
दरांनी मागील 3 महिन्यात मोठा उच्चांक गाठला आहे. गत तीन महिन्यांत डीएपी 12 टक्के वाढ झालीय. त्यामुळे आता पिकासाठी आवश्यक खते कशी खरेदी करावी, असा
प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. सर्वच पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झालाय. त्यातच शासनाने
ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे मुग, उडीद, सोयाबीन यांची अद्यापही खरेदी सुरू न झाल्याने खासगीत व्यापारी कमी भावाने
मालाची खरेदी करताहेत. याच पार्श्वभूमीवर
शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना, शेतकर्यांना मिळणारा नफा या दोन्हीत मोठी तफावत येत आहे. त्यातच
खतांची दरवाढ सुरू असल्याने सबसिडीची मागणी जोर दरू लागली आहे.
No comments:
Post a Comment