जत,(प्रतिनिधी)-
इतरांची घरे बांधणार्या बांधकाम कामगारांचे स्वत:च्या घराचे स्वप्न आता लवकरच
पूर्ण होणार आहे. दिवाळी निमित्ताने राज्य सरकारने महाराष्ट्र
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दिल्या जाणार्या 2 लाख रुपयांच्या अनुदानात आता 50 हजार रुपयांची वाढ केली असून यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणारे अनुदान
जमेस धरता बांधकाम कामगारांना घरासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे सरकारी अनुदान मिळू शकणार
आहे.
बांधकाम व्यवसायातील कामगार मोठ्या प्रमाणावर असंघटित
असल्यामुळे अनेक योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बांधकाम कामगारांचे घर हा देखील यातलाच एक भाग आहे. आपल्या
सर्वांचे घर बांधणार्या या कामगारांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी करावे यासाठी
क्रेडाईचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी पुढाकार घेतला. बांधकाम कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमचे
सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दिल्या जाणार्या अनुदानात
50 हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. या निर्णयामुळे आता कामगारांना रुपये पाच लाखांपर्यंत सरकारी अनुदान मिळू शकणार
आहे.
No comments:
Post a Comment