जत, (प्रतिनिधी)-
दीपावली सण जसाजसा जवळ येत आहे. त्याप्रमाणात बाजारपेठ दिवसागणिक अधिक सज्ज होत चालली आहे. आणि त्याच प्रमाणात नागरिकांचाही खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शहरातील बाजारपेठेत शुक्रवारी पहायला मिळाले.
दीपावली सणासाठी लागणार्या वेगवेगळ्या साहित्यांनी दुकानी गजबजल्या आहेत. हिंदू धर्मांमधील सर्वात मोठा दीपावलीचा सण आहे. यामुळे हा सण काही दिवसांवर येताच सणाची लगबग लहान- मोठ्यांमध्ये सुरू होते. दीपावली म्हटले की, घरांवर रोषणाईची सजावट आली. दारासमोर आकाशकंदिल, तोरण आले. लक्ष्मी पूजेसाठी फडी-फडा, लक्ष्मीमूर्ती आलीच, या शिवाय सणच पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणजे पणत्या, बोलके आले. दारासमोर पांढरी, पोपटी, मोरपंख, निळा, लाल, ऑरेंज, भगवा, मेंदी कलरची रांगोळी आली. यासह अनेक साहित्याने सध्या बाजारपेठ गजबजली असून नागरिकांचाही खरेदीला बर्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी वर्षभराचा सण आहे. म्हणून अनेकजण रिण काढून सण साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्यांच्या हाती खरीप पीक आले नाही. पिकांवर वारेमाप केलेला खर्चही मातीमोल झाला. यामुळे शेतकर्यांनी आता रबी पिकांचीही आशा-अपेक्षा सोडली आहे. हे जरी खरे असले तरी नागरिकांचा उत्साह बाजारपेठेत मागील वर्षीच्या तुलनेत थोडासा कमी असल्याचे दिसत आहे. या वर्षीचे बाजारपेठेतील खास आकर्षण म्हणजे चायना आकाश कंदिल आले नसून, भारतीय आकाश कंदिल विक्रीसाठी आले आहेत. त्यात विशेष म्हणजे हँडमेड आकाशकंदिल सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
No comments:
Post a Comment