बेळगाव,(प्रतिनिधी)-
बेळगावमध्ये
कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच आहे. बेळगावसह इतर मराठी भाषक
भूभाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे
’काळा दिन’ पाळण्यात आला. त्यावेळी सायकल फेरीत सहभागी झालेल्या मराठी तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला.
तसेच बेदम मारहाण केली. सोबतच अश्रुधुराच्या नळकांड्यादेखील
फोडण्यात आल्या. या घटनेनंतर सर्वच स्तरांतून संताप आणि निषेध
व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटक सरकारच्या
निषेधार्थ सायकल फेरी काढली होती. या फेरीत हजारो मराठी तरुण
सहभागी झाले होते. यावेळी तरुणांनी सरकारच्या दडपशाही विरोधात
जोरदार घोषणा दिल्या. तसेच बेळगाव, बिदर,
भालकीसह मराठी भाषक सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या 62 वर्षांपासून कर्नाटकात राज्यनिर्मिती दिनाच्या निषेधार्थ काळा दिन पाळला जातो.
या दिवशी कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षण वेदिकेकडून बेळगावमध्ये कर्नाटकात
राज्योत्सव साजरा केला जातो. तर त्याला विरोध म्हणून मराठी तरूण
सायकल फेरी काढतात. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने
काल काळा दिन पाळला जात होता, त्यावेळी हा प्रकार घडला.
No comments:
Post a Comment