जत,(प्रतिनिधी)-
सध्या शहरात दिवाळी सणाचा उत्साह जाणवत
असून त्यादृष्टीने लगबग सुरू आहे. या सणात आकाशदिव्यांचे
वेगळेच महत्त्व आहे. शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे यंदा
कापडी आकाशदिव्यांना मागणी वाढली आहे. याशिवाय बचत गटांनी तयार
केलेल्या तसेच पर्यावरणपूरक आकाशदिव्यांचीही धूमधडाक्यात विक्री होताना दिसत आहे.
आकाशकंदिलाच्या बाजारात चिनी बाजारपेठेचा जवळपास अस्त झाला असून यंदा पारंपरिक व कापडी आकाशकंदिलांनाच प्राधान्य दिले जात आहे. आकाशकंदिलांच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली असली तरी पारंपरिक कंदिलाची मागणी मात्र अनपेक्षितरीत्या वाढली आहे. शहरातील अनेक ठिकाणी आकाशकंदील विक्रेत्यांची दुकाने थाटली गेली आहेत. 10 ते 1100 रुपयांपर्यंत आकाशकंदिलांची विक्री होत आहे. षटकोन, गोल अशा आकारांमध्ये नावीन्यपूर्ण आकाशकंदील बाजारात आहेत.
दिवाळीच्या साधारण तीन दिवस अगोदर आकाशकंदिलांची विक्री होते.
हिंदू संस्कृतीच्या दिवाळी सणात आकाशकंदिलांना आगळे-वेगळे स्थान आहे. यंदा हँडवर्कपासून तयार केलेले आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत.
आकाशदिव्यांच्या बाजारात एकेकाळी चिनी वस्तूंचा मोठा बोलबाला होता. चिनी आकाशदिवे हातोहात विकले जायचे. यंदा मात्र चिनी आकाशदिव्यांना ग्राहकांनी नापसंती दर्शविली आहे. स्वदेशी आणि पारंपरिक आकाशदिवेच नागरिक विकत घेत असल्याची माहिती शिंदे स्टेशनरीच्या मालकांनी सांगितले.

No comments:
Post a Comment