जत,(प्रतिनिधी)
जत तालुक्यातील गुड्डापूर, सिद्धनाथ, तिकोंडी व संख परिसरातील तलाव भरण्यासाठी सर्वेक्षण
व अंदाजपत्रक तयार झाले असून येत्या पंधरा दिवसांत या कामाला सुरुवात होणार असल्याची
माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे व जिल्हा उपप्रमुख तम्माजी कुलाळ यांनी
दिली. प्रशासनाने विनाविलंब तलाव पाण्याने भरून घ्यावेत,
अशी मागणी केली असल्याचे सांगितले.
म्हैसाळ विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांची
सांगली येथे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासह भेट घेऊन घेतली व निवेदन दिले. यावेळी त्यांनी या कामासंदर्भातील पत्र दिले. यावेळी
अंकुश काळे व तम्माजी कुलाळ म्हणाले की, जत तालुका हा सांगली
जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या
तालुक्याच्या पूर्वभागातील गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावे म्हणून जत तालुका
शिवसेनेच्या वतीने गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे. यासंदर्भात
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यमंत्री विजय शिवतारे
यांच्याशी अनेक वेळा भेट घेऊन या परिसरात पाणी मिळावे, याची सातत्याने
मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन मंत्री विजय शिवतारे व
कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील यांनी
विशेष प्रयत्न करून जत तालुक्यातील गुड्डापूर, सिध्दनाथ,
संख, तिकोंडी या तलावाचे संरक्षण करून ताबडतोब
अंदाजपत्रक तयार करून येत्या पंधरा दिवसांत ’म्हैसाळ’च्या पाण्याने हे तलाव भरून घ्यावेत, असे पत्र दिले आहे.
या परिसरातील
तलाव भरण्याचा मार्ग आता पूर्ण झाला असून याचा निश्चितपणे फायदा
या परिसरातील नागरिकांना होणार आहे. या तलावात पाणी सोडण्यासाठीचे
सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करण्यासाठी म्हैसाळ योजनेच्या कार्यालयामार्फत
निविदा प्रक्रिया सुरू असून तांत्रिक लखोटा उघडण्यात आला असून त्यामध्ये ठेकेदाराची
नेमणूक करून ही कामे 15 दिवसांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी
सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते,
आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख तमाजी कुलाळ,
तालुकाप्रमुख अंकुश काळे, तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर माने, हरिश्चंद्र कांबळे,
जेटलिंग कोरे, धोंडिबा बोरकर, महादेव माळी, सीताराम जाधव, शशिकांत
माळी आदी नेते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment