Wednesday, April 3, 2019

घामाच्या धारांनी नागरिक हैराण


 जत,(प्रतिनिधी)-
 भाजून काढणार्‍या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्किल होत असून, घामाच्या धारांनी जतकर हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून 42 अंश सेल्सिअस तापमान गेल्याचे दिसत आहे.

  सध्या एप्रिल महिना संपत आला  असून, उन्हाचा प्रचंड असा  चटका जत तालुक्यातले नागरिक  अनुभवत आहेत. सकाळी साडेदहा ते अकरापासूनच वातावरण तापण्यास सुरुवात होत आहे. दुपारी बारानंतर तर भाजून काढणार्‍या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्किल होत आहे. उन्हाळ्याचा अजून एक महिना बाकी आहे. तो कसा काढायचा याची चिंता लोकांना सतावत आहे.
 चटका देणाऱ्या या उन्हात दुपारी बाहेर पडणे त्रासाचे ठरत आहे. रस्त्यांवरील गरम वाफांमुळे वाहन चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे बाहेर पडायचेच झाल्यास तोंडाला स्कार्फ बांधून आणि डोक्यावर टोपी घालून बाहेर पडण्यास प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे लग्नसराई सुरू असल्याने मात्र त्यास हजेरी लावणे क्रमप्राप्त होत आहे. प्रत्यक्षात लग्न मंडपात घामाच्या धारांमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उकाडा असह्य होत असल्याने पंखा अथवा कूलरचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, रात्री पंख्यांची पातीही गरम हवा फेकत असल्याने घरात बसणे आणि झोपणेही कठीण होत आहे. त्यातच डासांनी उच्छाद मांडल्याने उन्हाळ्याचे दिवस असह्य झाले आहेत

No comments:

Post a Comment