Thursday, April 4, 2019

गुढा पाडव्याला मुहुर्ताच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग


जत,(प्रतिनिधी)-
हिंदू नववर्ष असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठीने जत बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. सणाच्या पूर्वसंध्येला साखरेच्या माळा चिव्यांची काठी अशा पूजेच्या साहित्याबरोबरच मुहुर्ताच्या खरेदीची ही सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.

हा सण कॅश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू होम अप्लायन्सेस वाहन यासह सर्व उद्योजक व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात होते त्याचनुसार वर्षातील सगळे सण साजरे होतात म्हणून या महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो. वर्षातील साडेतीन मुहुर्तापैकी पहिला आणि पूर्ण मुहूर्त म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे यानिमित्त जत शहरात तील बाजारपेठेत साखरेच्या माळांची मोठी आवक झाली आहे. विविध रंगांतील या माळा दहा रुपयांपासून उपलब्ध आहेत गुढी उभारण्यासाठी लागणारी चिव्याची काठी शंभर रुपये पासून उपलब्ध आहे या दिवशी कौटुंबिक समारंभ गृहप्रवेश नवीन व्यवसाय उद्योगाचा शुभारंभ अशी मंगल कार्यालय हाती घेतली जातात. त्यामुळे कपड्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.शहरातील नगर परिषद परिसर व बाजारपेठेत नवीन कपडे घेण्यासाठी महिलांच्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

No comments:

Post a Comment