जत,(प्रतिनिधी)-
तिप्पेहळ्ळी ( ता.जत ) येथे उसने पैसे परत देण्याच्या कारणावरून उज्वला शिवशरण ( वय ४० ) त्यांचे पती शिवाजी शिवशरण (४५ ) यांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अमित शिंदे, महेश चव्हाण , संकेत भिसे, अनिकेत भिसे सर्व रा.तिप्पेहळ्ळी या चार जणांच्या विरोधात उज्वला शिवशरण यांनी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान तिप्पेहळ्ळी गावात घडली या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही .
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की अमित याचा भाऊ अमर यांच्याकडून उज्वला यांचा मुलगा प्रथमेश याने व्यवसायासाठी चार महिन्यापूर्वी तीस हजार रुपये उसने घेतले होते सदरचे पैसे परत करा अशी मागणी वरील चार जणांनी उज्वला व शिवाजी शिवशरण यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी केली असता त्यांच्यात सुरवातीस शाब्दिक चकमक व बचाबाची झाली त्यानंतर याचे रुपांतर मारामारीत झाले यावेळी वरील चार जणांनी उज्वला शिवशरण व त्यांचे पती शिवाजी शिवशरण त्यांना लाथाबुक्या व काठीने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली आहे. पुढील तपास जत पोलिस करत आहेत.
No comments:
Post a Comment