जत,(प्रतिनिधी)-
ब्रम्हज्ञान प्राप्त झालेनंतर जे गुण प्राप्त व्हायला पाहिजे ते गुण प्राप्त होताना दिसत नाही.जिवनामध्ये ब्रम्हज्ञानाची अखंड ज्योत कायम राहयाची असेल तर मुखामध्ये सदा ईश्वराचे नामस्मरण असले पाहिजे नामस्मरणानेच देह पवित्र होतो असे प्रतिपादन राम मंदिर जत येथे आयोजित निरंकारी साप्ताहिक सत्संगमध्ये आदरणीय रामचंद्र डकरे (प्रचारक सांगली) यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आपले इंद्रिय जोपर्यंत पवित्र होत नाही, तोपर्यंत देह पवित्र होत नाही. इंद्रिय पवित्र व्हायची असेल तर ईश्वरीय ज्ञानाचा आधार घेतला पाहिजे.ज्या मुखाने नामाचा जप करायला पाहिजे त्याच मुखामध्ये मानव अनेक व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या जिवनाचा नाश करीत आहे आपले जीवन व्यर्थ घालवत आहे.काम आणी क्रोध इंद्रियांच्या अधिन आहेत यातुन सुटका होणेसाठी जिवनामध्ये सद्गुरु येणे आवश्यक आहे आणी सद्गुरुने जे ब्रम्हज्ञान दिलेले आहे ते जिवनाध्ये उतरल्यास जिवन आनंदी सुखमय बनेल आशा भावना व्यक्त केल्या.
ततपुर्वी मंत्रालय मुंबई येथे वित्त विभामध्ये सेवेत कार्यरत असणारे श्रीकांतजी लोंढे यांनी निरंकारी मंडळाविषयची संपुर्ण माहिती देताना म्हणाले की मंडळाची स्थापना १९२९ रोजी पेशावर आजचे पाकिस्तान येथे झाली आजपर्यंत मंडळाने जगामध्ये विश्वबंधुत्व ,शांतता,प्रेम, आपुलकी प्रस्थापित होणेसाठी सद्गुरु बाबा भुटासिंह,बाबा अवतार सिंह,बाबा गुरुबचन सिंह, बाबा हरदेव सिंह, सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यासारखे अवतारी सद्गुरु होऊन गेले आणी आज समयाला निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज तुम्हा आम्हाला खऱ्या भक्तीची शिकवण देऊन संपूर्ण मानवजातीला एक धाग्यांमध्ये जोडण्याचे महान कार्य करीत आहेत.फक्त आपण त्यांनी देलेले ब्रम्हज्ञान आत्मसात करून जिवन जगले पाहिजे.त्यांनी मंडळाचा पवित्र असा महान ग्रंथ अवतार वाणीचा सहारा घेऊन मनुष्य जन्म फुकट वाया न घालवता मानवाचे कल्याण कशामुळे होईल याबाबतचे विचार मांडले.
त्याचबरोबर सांगली येथुन आलेले सिध्दु जाधव,महेश संकपाळ, नारायण संकपाळ,सचीन सुर्वे यांनी भक्तिगीत विचार व्दारे भक्ति कशा प्रकारे केल्यास सार्थक होईल याबाबतचे विचार मांडले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता साळे यांनी केले.नियोजन जत शाखेचे जोतिबा गोरे, संभाजी साळे,संज्योती साळुंखे केले.
No comments:
Post a Comment