जत,(प्रतिनिधी)-
फुकट दोन काँटर दारू पाजली नाही म्हणून तोंडावर जोरदार बुक्की मारून पुढील एक दात पाडल्याच्या आरोपावरून लखन चंद्रकांत पाथरुट ( वय ३०) व अजय महेंद्र कांबळे ( वय २५ ) रा. दोघे वसंत नगर जत यांच्या विरोधात यल्लाप्पा परशुराम बामणे ( वय ३५ रा. विठ्ठल नगर जत ) याने जत पोलीसात फिर्याद दाखल केली आहे . ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान जत ते शेगांव रस्त्यावरील हॉटेल यशराज समोर घडली आहे . याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , लखन पाथरूट व अजय कांबळे हे दोघेजण हॉटेल यशराज मध्ये दारू पित बसले होते त्यानंतर यल्लाप्पा बामणे तेथे एकटे दारू पिण्यासाठी गेले असता लखन व अजय यांनी आम्हाला दोन कॉटर दारू सांग व त्याचे बिल तू दे असे त्याला सांगितले . सध्या माझ्याकडे इतके पैसे नाहीत परत कधीतरी मी सांगतो आता सांगू शकत नाही असे बामणे यानी त्या दोघांना सांगितले. त्यानंतर बामणे हाँटेलच्या बाहेर आल्यानंतर लखन व अजय हे दोघेजण पाठीमागून आले. तू आम्हाला काँटर का सांगतला नाहीस अशी हुज्जत बामणे बरोबर घालून त्याच्या तोंडावर बुक्की मारून त्याचा समोरील एक दात पाडून त्याला गंभीर जखमी केले आहे .याप्रकरणी बामणे यांनी लखन पाथरूट व अजय कांबळे यांच्या विरोधात रात्री उशिरा जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .याप्रकरणी अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही .या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक बाबुराव पाटील करत आहेत .
No comments:
Post a Comment