जत,(प्रतिनिधी)-
येळवीचे
सुपुत्र ओंकारस्वरूपा सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक अनिल अंकलगी यांची पदवीधर अभियंता
म्हाडा संघटनेच्या अध्यक्षपदी 159 विरूध्द 47 (112) मतांनी निवड झाली. अनिल अंकलगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळावे म्हणून त्यांच्यासाठी विविध भागात स्पर्धा परीक्षेचे
मार्गदर्शन व क्लासेस सुरु केले. जलसंपदा विभागात अभियंता म्हणून
कार्यरत असताना त्यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करून यशाची शिखरे
गाठत म्हाडा पदवीधर अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
No comments:
Post a Comment