Saturday, April 13, 2019

सनमडी, येळवी तलावात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्याच्या पूर्व भागातील 37 गावांसाठी 47 टँकरने 102 खेपांद्वारे अंकलगी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तलावांमध्ये 220 एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा टँकर भरण्यासाठी एप्रिलअखेर पुरेल इतपत आहे. यासाठी येळवी व सनमडी या तलावात उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

  तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी अंकलगी तलावातून 37 गावांसाठी 47 टँकरने पाणीपुरवठा होतोय. मात्र या तलावातील पाणी संपत आले आहे. म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची गरज आहे. जत येथील बिरनाळ तलावातून टँकर भरणे साठी प्रतिखेपामागे 40 ते 45 किलोमीटर अंतर वाढवून शासनाचा 51 हजार 848 रुपये खर्च वाढेल. हा खर्च वाढल्यामुळे टँकर खेपा कमी होणे यासारखे अडचण निर्माण होतील. त्यामुळे बिरनाळ तलावावर टँकर भरणे संयुक्तिक ठरणार नाही. येळवी व सनमडी तलावावर टँकर भरले प्रतिखेपा 20 ते 25 किलोमीटर अंतर वाचणार आहे. त्यामुळे सनमडी, येळवी तलावातून पाणी भरणे सोयीस्कर होईल. परंतु सध्या सनमडी तलाव कोरडा आहे. येळवी तलावात 10 एमसी एफटी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच येळवी तलावात स्थानिक शेतकर्यांची शुल्क भरून पाणी घेतलेले आहेत. त्यातील दोन शेतकर्यांच्या विहिरीचे अधिग्रहण करून नऊ गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. छोटी सातत्याने टँकर भरण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे सनमडी तलावात 11.9 एमसी एफटी व येळवी तलावात 4.4 एमसीएफटी पाणी भरले, तर पुढील चार महिन्यांकरिता टँकर भरण्याची सोय होणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment