Monday, April 15, 2019

बिळूर प्राथमिक उर्दू शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जत (नजीरभाई चट्टरकी यांजकडून) -
जत तालुक्यातील बिळूर येथील   जि.प. प्राथ उर्दु शाळेत नुकतेच वाषिर्क स्नेसंमेलन व विविध गुणर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवा इस्लाम धर्मियांचे पवित्र कुराण पठनाने झाली.अल्पसंख्यांक योजनेचे जाणकार व जत येथील अंजुमन उर्दु हायस्कूल चे मुख्याध्यापक रईस अहेमद खान यांनी अल्पसंख्यांक प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती दिली तसेच जि.प.उर्दु शाळा उटगीचे मुख्याध्यापक नजीब पटेल यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व व त्याचे विद्यार्थी  जीवनातील सर्वांगीण  विकास  याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात जि.प.उर्दू शाळा बिळुर व जि.प.उर्दू शाळा गुगवाड यांच्या संयुक्त विध्यमाने विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमाने उपस्थिताचे मने जिंकली.या प्रसंगी शालेय विद्यर्थी व विद्यार्थिनींनी आपल्यातील  सुप्त गुणांना वाव देत देशभक्ती गीत,सामूहिक नृत्य कला,गायन अशा विविध गुण प्रदर्शन सादर करून उपस्थितांना  मंत्रमुग्ध केले.   
 त्यानंतर  नियोजित आगामी शैक्षणिक वर्ष  सन २०१९-२०साठी इ.१ लीत दाखल पात्र विद्याथ्याना शालेय बॅग्स व शैक्षणिक साहित्य  देवून त्यांचे स्वागत करण्यात आले शालेय बॅग्स चे वाटप शाळेकडून वितरित   करण्यात आले तसेच सन २०१९या शैक्षणिक वर्षचा सर्वॆत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थीनी म्हणून कु.सुफिया मिरासो मुल्ला हिची निवड करण्यात आली व तसेच तिचा सत्कार करण्यात आला.प्रस्तुत शैक्षणिक वर्षतील विविध उपक्रमामधील स्पर्धेतील विजयी विद्यार्थीना प्रतिष्टितांच्या हस्ते   पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष   स्थान  शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दस्तगीर उमराणी यांनी भूषविले. बिळुर गावचे मुस्लिम जमातीचे अध्यक्ष शमशुद्दीन उमराणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेहबूब उमराणी.रमजान मंगळवेढे,अल्लाबक्ष व्हनवाड,शकील मुल्ला सर,पैगंबर उमराणी,जि.प.उर्दू शाळा गुगवाडचे मुख्याध्यापक शाहीन मतवाल,व शिक्षिका अशीया शरीकमसलत,गुगवाडचे व्यावस्थापन समितीच्या अध्यक्षा मुमताज खोजनवाडी,व कमाल मुल्ला जि.प.उर्दू शाळा जतचे शिक्षक माजीद अन्सारी धावडवाडी,जि.प.उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन हैद्राबादे व सामाजिक कार्यकर्ते समीर हैद्राबादे,तसेच जामिया जैतुनिया, मदरसेचे मौलाना हाफिज, युनुस व्हनवाड,तसेच गावातील प्रतिष्टित नागरिक व पालक  उपस्थित होतो.सदर कार्यक्रमाचे नियोजन व संचलन जुबेर शेख व मुख्याध्यापक समीना खलिफा यांनी केले या कार्यक्रमात केंद्रप्रमुख महादेव गडीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment