Wednesday, April 10, 2019

दुष्काळी जनतेला खुळ्यात काढणार्‍यांना मते देऊ नका : विक्रम सावंत


जत ,(प्रतिनिधी)-
 पाणी देण्यावरून दुष्काळी जनतेला खुळ्यात काढणार्यांना दारातही उभे राहू देऊ नका, असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी केले. सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जत तालुक्यातील डोर्ली येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विशालदादा पाटील, महादेव पाटील, आप्पा मासाळ, आत्माराम बिराजदार उपस्थित होते. विक्रम सावंत म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात टंचाई निधीतून पाणी तसंच मिळत होतं. काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, आर. आर.आबा पाटील हे सत्ता काळात टंचाईतून बिले भरत होते. त्यामुळे पाणी मिळायचे. पण भाजप सरकारने पैसे भरूनही सहा-सहा महिने पाणी दिले नाही. पाण्याचा प्रश्न भाजपच्या नेत्यांनी सोडवला नाही. पूर्व भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी कोणतीही योजना मंजूर नाही.पैसे भरूनही पाणी न देणार्या भाजपला मतदान करू नका. तरूण लढवय्या स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनाच आपण निवडून आणूया, असे आवाहन विक्रम सावंत यांनी केले.

No comments:

Post a Comment