Monday, April 1, 2019

संजय पाटील यांची जत तालुक्यात जोरदार प्रचार मोहिम


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी जत तालुक्यात आपल्या प्रचाराची जोरदार मोहिम राबवली. तालुक्यातल्या दक्षिण आणि उत्तर भागातील अनेक गावांना भेटी दिल्या आणि तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी द्या, असे आवाहन लोकांना केले.

संजय पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात प्रचारदौरे जोरात झाले. यात कवठेमहांकाळ शहरातील ठिकठिकाणी प्रभागात खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील ठिकठिकाणी भेटी दिल्या. तर जत तालुक्यात स्वतः उमेदवार संजयकाकांनी विविध गावांना भेटी देऊन गावकर्यांशी चर्चा केली. यावेळी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील भाजपसेना महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी काल जत तालुक्यातील बिळूर, जत, डोर्ली आणि हिवरे या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी आमदार विलासराव जगताप, डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगौडा रवी पाटील, प्रकाश जमदाडे, शिवाजी ताड, सरदार पाटील, सुनील पवार, प्रभाकर जाधव, अजित पाटील, अंकुश हुवाळे, तम्मा कुलाळ, संजय कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री. संजयकाका पाटील यांनी काल जत तालुक्यातील वाळेखिंडी, धावडवाडी, गुळवंची आणि प्रतापूर या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कवठेमहाकांळ तालुक्यात उमेदवार संजयकाकांच्या पत्नी सौ. ज्योती संजयकाका पाटील यांनी विविध गावांना भेटी देत महिलांशी संवाद साधला. कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष सविताताई माने, अध्यक्ष अनिल लोंढे, सभापती दादासाहेब कोळेकर, शहराध्यक्ष दिलीप काका पाटील, सभापती अय्याज मुल्ला, नगरसेवक लालासाहेब वाघमारे, सिंधूताई गावडे, नगरसेवक शेवंता शेंडगे, कुणाल कोठावळे, महावीर माने, नगरसेवक रुस्तुम शेखडे जनार्दन दादा पाटील, सभापती वैशालीताई पाटील, अक्षय पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष दीपाली पाटील, सभापती रोहिणी शिरतोडे, सरपंच संगीता गवळी, अनुराधा शिंदे, सभापती सुनंदा पाटील, सभापती पूनमताई सूर्यवंशी आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment