Tuesday, April 9, 2019

जत तालुक्याला मोफत पाणी देणारः विशाल पाटील

फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत 
जत,(प्रतिनिधी)-
प्यायला पाणी नसताना शेतीच्या पाण्यासाठी पैसे घेण्याचे पाप भाजप ने केले आहे पण मी तुम्हाला वचन देतो खासदार झाल्यावर शेती ला पाणी मोफत दिले जाईल. असे अश्वासन स्वाभिमानी चे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दरिबडची येथे दिले.

त्यांचा जत तालुका प्रचार दौरा आज मेंढेगिरी येथून सुरू झाला या प्रचाराच्या सुरुवातीला विशालदादा पाटील बोलत होते. देवनाळ, मेंढिगिरी, उंटवाडी, रावळगुंडी, मुचंडी, दरीबडाची, संख, भिवर्गी, तिकोंडी, करेवाडी (को.बो.) , कोंतेबोबलाद या गावांचा दौरा मंगळवारी दुपारपर्यंत झाला. तालुक्यातील विविध गावात विशाल दादांचे फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे सरकार,  विक्रमदादा सावंत,  बाबासाहेब कोडग, महादेव आंकलगी, श्रीकांत शिंदे, मच्छिंद्र वाघमोडे, अप्पासाहेब पवार, रमेश, पाटील, सिद्धअण्णा सिरसाट, प्रकाश पाटील, सुभाष बिराजदार, सुरेश कांबळे यांच्या सह कार्यकर्ते सहभागी झाले.
विशालदादा म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा म्हैसाळ योजनेचे जनक आहेत.  जत तालुक्याला पाणी देण्याचे त्याचं स्वप्न होतं आणि ते पाणी प्रतिकदादा पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच पूर्ण होत आले.  जत तालुक्याची पाण्याचा प्रश्न वसंत दादा घरच सोडूवू शकते. दादांच्या नंतर या योजनेचे काम थांबलं होतं परंतु सन 2009 ला प्रतिकदादा खासदार झाले आणि या योजनेचा एआयबीपी मध्ये समावेश करण्यात आला प्रतीक दादांनी आपल्या कार्यकाळात एक हजार कोटी रुपये त्यासाठी आणले आणि त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न मात्र अनेकजण करताहेत. प्रत्येकाच्या शेतात पाणी आलं पाहिजे हे आमचं ध्येय आहे आणि हे पाणी शेतकर्‍याला फुकट मिळालं पाहिजे. आणि कसल्याही परिस्थितीत जत तालुक्यातील शेतकऱ्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मी मोफत मिळवून देईन.  आपल्या खासदारांनी विरोध गावात 13 लाख रुपये गोळा केले आणि पाणी आले म्हणून हत्तीवरून मिरवणूक काढली आणि मिरवणूक संपेपर्यंत आलेलं पाणी हे गेलं. गोळा केलेल्या 13 लाख रुपयांमध्ये फक्त तीन लाख रुपये शासनाला भरले उर्वरित दहा लाख रुपये अशीच उधळपट्टी केली. असा उधळपट्टी करणारा खासदार फक्त लुटण्याचा उद्योग करत आहे. अशी टीका विशालदादा पाटील यांनी केली.
खासदारांनी दिल्लीत जाऊन काय करायचं असतं हेच मुळात आपल्या खासदारांना कळलं नाही. ज्यांना हिंदी आणि इंग्रजी साधा बोलता येत नाही तेच दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार आहेत हे आपल्याला माहीत आहे पण तुम्ही आपल्या सर्वांचे प्रश्न संसदेपुढे मांडी याचा मला विश्वास आहे.
चौकट
आज जत तालुक्याची अवस्था भयानक आहे जनावरांना प्यायला पाणी नाही. चारा नाही. माणसांना प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत टँकर सुद्धा मिळू शकत नाही. मी आपल्याला न्याय मिळवून देईन.

No comments:

Post a Comment