Monday, April 1, 2019

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा : शिवाजी खांडेकर


जत,(प्रतिनिधी)-
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या युवकांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करून आपल्या आयुष्यातील करिअरला सुरवात करावी, असे प्रतिपादन शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे महासचिव शिवाजी खांडेकर यांनी केले. ‘येळवी यूथ फेस्टिव्हल -2019’चे आयोजन सावली फौंडेशन यांच्या वतीने आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

खांडेकर म्हणाले, ग्रामीण भागातील युवक हा शेतकरी कुटुंबातील असून शिक्षणासाठी प्रत्येकाने एकत्रित येऊन आपल्या गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना येळवीसारख्या ग्रामीण भागात एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीने शैक्षणिक काम उभ राहत असेल तर ही गोष्ट अभिमानाची आहे. सावली फौंडेशन या सेवाभावी संस्थेने जो हा उपक्रम राबवला. तो गावपातळीवरील नसून हा राज्यपातळी दर्जेचा आहे.
 खर्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे व्यासपीठ येळवीयूथ फेस्टिव्हल -2019’च्या माध्यमातून आयोजन करीत असताना यूथ टॅलेंट सर्च एक्झाम येळवी मॅरेथॉन, माँ तुझे सलाम, बंध माणुसकीचे आणि यशवंतांची गौरवगाथा, सन्मान संस्थांचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी अध्यक्ष सुनील साळे व सचिव प्रकाश गुदळे आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.
यूथ टॅलेंट सर्च लहान गटात प्रथम 5001, द्वितीय 4001, त्रितीय 3001, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह अनुक्रमे दयानंद बाबासो याने 100 पैकी 74, सुधीर सोपान मेटकरी 70 गुण, धीरज दिनकर व्हनमाने गुण 68गुरुकुल विद्यापीठ (राजुरी), खुला - गट प्रथम 11,111, द्वितीय 7,777, तृतीय 5,555, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह अनुक्रमे हेमंत बबन पाटील (ठाणे) 200 पैकी 174 गुण, रणजित रविकिरण शेंडे गुण 140 (शेगाव), सागर सुखदेव सांगोलकर गुण 134 रेड्डे, तरयेळवी मॅरेथॉनलहान गटात प्रथम 5001, द्वितीय 4001, तृतीय 3001 व प्रशस्तिपत्र व सन्मान चिन्ह अनुक्रमे विजय ढोबळे (परभणी), सुनील घागरे (सांगली), सुरेश कोळेकर (आरेवाडी), खुल्या गटात प्रथम 7001, द्वितीय 6001, तृतीय 5001 व प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह अनुक्रमे किरण पांडुरंग मागे (परभणी), राजू कृष्णा नाईक (अथणी), शिवानंद दोडमणी (अथणी) यांनी यश संपादन केले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर, प्रा. डॉ. प्रमोद गंगनमाले, महादेव बाड, ओंकार गडदे, विनायक शिंदे, बाबासाहेब सोलनकर, बी. एस. पाटील, सत्यजित आवटे, सचिन सुरवसे, पांडुरंग खोत, रामचंद्र शिंदे, महादेव टेंगले, देवाप्पा करांडे, मुख्याध्यापक शहाजी शिंदे, संजय चव्हाण, नंदकुमार खंडागळे उपस्थित होते. जिव्हाळा उद्योग समूह, नवजोत अॅग्रोटेक इंडस्ट्रीज किरण रणजित फोटो स्टुडिओ यासाठी विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment