जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने रविवार दि.7 रोजी एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होणार आहे.यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते व जिज्ञासू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध प्रात्याक्षिके व व्याख्याने दिली जाणार आहेत. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, प्रशिक्षण विभाग राज्यकार्यवाह सुनिल स्वामी यांच्यासह जिल्हा स्तरीय मार्गदर्शक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सदर प्रशिक्षण रविवार दि.०६ एप्रिल २०१९ रोजी
सकाळी १० ते सायं. ५ वा. या दरम्यान जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 च्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे आणि जिज्ञासू व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सनमडीकर,सरचिटणीस रवी सांगोलकर यांनी केले आहे.
संपर्क- ९७६३७८०००८, ९९७५७३६७६०,८४८५०९२३४८,८९७५७०२४६४
No comments:
Post a Comment