Monday, April 1, 2019

सेवानिवृत्तीनिमित्त नागाप्पा होर्तीकर यांचा सत्कार


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसंगी (जत )येथील मुख्याध्यापक नागाप्पा सोमाणा होर्तीकर यांची सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामपंचायत आणि शाळा व गुड्डापूर केंद्राच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा दुहेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
लक्ष्मण गायकवाड, अशोक घोदे,चनबसू चौगुले, देवाप्पा कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सरपंच श्रीमंत पाटील, उपसरपंच विकास जाधव, ग्रामसेवक आप्पू बिराजदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ कोळी, ग्रामपंचायत सदस्य सिद्धू गायकवाड, गुड्डापुर केंद्राचे केंद्राप्रमुख आर. एम. जगताप, मुख्याध्यापक आण्णसाहेब कबाडगे, शशिकांत कुलकर्णी, सुभाष हुवाळे, मल्लिकार्जुन कोळी, स्वाती जाधव, भीमाण्णा मनकलगी यांच्याबरोबर गुड्डापूर केंद्रातील अनेक शिक्षक मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment