जत,(प्रतिनिधी)-
भाजपमध्ये
आला तरच पाणी देतो, असे म्हणून राजकारणासाठी पाणी अडविण्याचं
पाप ज्यांनी केलं, त्यांना जनता कदाफी माफ करणार नाही.
त्यामुळे स्वाभिम ानीचाच विजय होणार आहे, असा विश्वास स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी डफळापूर (ता. जत) येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जत तालुक्यातील दुसर्या दिवशीच्या दौर्याचा प्रारंभ धावडवाडी येथून केला.
हिवरे, अंकले, बाज,
बेळंखी, डफळापूर, कुडणूर,
शिंगणापूर, मिरवाड, जिरग्याळ,
एकुंडी, वज्रवाड, गुगवाड,
बसर्गी, सिंदूर, उमराणी,
खोजानवाडी, बिळूर, येळदरी
या गावांचा दौरा होता. सुरेश शिंदे, विक्रम
सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील,
शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, आप्पाराया बिराजदार,
चंदूलाल शेख, महादेव पाटील, जी.के. माळी, शंकरराव गायकवाड, बी. आर.
पाटील, भारत गायकवाड, हुसेन
आत्तार, अजित भोसले, अब्दुल मकानदार,
पोपट शिंदे, भानूदास गडदे, मनोहर भोसले, अजितराव गायकवाड, अश्फाक शेख, दिलावर शेख यांच्यासह कार्यकर्ते प्रचार
दौर्यात सहभागी झाले.
विशाल पाटील म्हणाले, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी डफळापूरच्या बोकडतोंडी तलावात
पाणी आणले होते. वसंतदादांनी म्हैसाळ प्रकल्प उभा केला.
ते असते तर वीस वर्षापूर्वीच जतला पाणी मिळाले असते. प्रतीकदादांनी एक हजार कोटींचा निधी आणला. मात्र ते कधीही
कुठल्याही उद्घाटन करायला गेले नाहीत. पण विरोधकांनी मात्र फक्त
कोटी आणले आणि कोटी नारळ-नारळ फोडले. जर
भाजमध्ये येणार असाल तरच पाणी सोडतो, असे पाण्याचे राजकारण त्यांनी
केले. या पापाची शिक्षा जनता त्यांना दिल्याशिवाय सोडणार नाही.
पाणी आणणे हे आमचे कर्तव्य आहे. पूर्ण जत तालुक्याला
पाणी मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विशाल पाटील पुढे म्हणाले,
सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जायला भाजपवाले मागे-पुढे बघत नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचा विचार केवळ त्यांना प्रचारासाठी लागतो; आचरणासाठी नाही.
लोकांच्याम ध्ये भांडणे लावायची. फूट पाडायची,
हे त्यांचं राजकारण आहे. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण असे अनेक विषय अर्धवट राहिले
राहिले आहेत. वर्षाला दोन कोटी नोकर्या
देतो, असे सांगणार्यांनी गेल्या पाच वर्षांत
एक ही नोकरी दिलेली नाही. जाती-पातीचं राजकारण
ते करत आहेत. न्याय योजनेतून गरीब कुटुंबाला वर्षाला
72 हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहपल गांधी यांनी
केली आहे. हे पैसे थेट नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहेत.
विशाल पाटील म्हणाले, भाजपने कितीही कारस्थान केले
तरी स्वाभिमानीच विजयी होणार आहे.
No comments:
Post a Comment